भारतीय हवाई दलाच्या ‘एरियल स्ट्राईक’चे चीनकडून समर्थन

aerial-strike
नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर भारताने केलेल्या या कारवाईचे जगभरातील बहुतांश देशांनी समर्थन केले आहे. त्यात विशेष म्हणजे दरवेळी पाकड्यांची पाठराखण करणाऱ्या चीनने देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन चीनने केले असून भारत-पाकिस्तानमधील संबंध पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर कमालीचे तणावपूर्ण बनले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम राखावा , दोन देशांमधील संबंध आणि सहकार्य यांच्या आधारावरच दक्षिण आशियामध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होऊ शकते, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता लु कांग यांनी दिली आहे. चीनने या कारवाई दिलेली प्रतिक्रिया पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण या दोन्ही देशांमधील संबंध जिव्हाळ्याचे आहेत, पण, चीनने भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त केलेला नाही. परिणामी भारताच्या दृष्टीकोनातुनही चीनकडून आलेली प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.

Leave a Comment