भारताला डिवचू नका नाहीतर जगाच्या नकाशातून गायब व्हाल – परवेझ मुशर्रफ

parvez-musharraf
आबूधाबी – पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे शेकडो दहशतवादी ठार झाले. पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी या ऐतिहासिक कारवाईच्या अवघ्या काही तासांपूर्वी पाकिस्तानला खडेबोल सुनावले होते. वारंवार भारताला पाकिस्तानने अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्या दिल्या आहेत. पण आपल्या देशाची सद्यपरिस्थिती माजी लष्करशहांनी मांडली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ म्हणाले, भारतावर जर पाकिस्तानने एकही अणुबॉम्ब टाकला तर त्यांचे नाव जगाच्या नकाशातून गायब होईल.

दरम्यान पाकिस्तानी दैनिक डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, 22 फेब्रुवारी रोजी दुबईत जनरल परवेज मुशर्रफ यांनी एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने भारत आणि पाकिस्तान वादावर चर्चा केली. मुशर्रफ यावर बोलताना म्हणाले, परिस्थिती कितीही बिघडली, तरी दोन्ही देशांमध्ये आण्विक युद्ध होणार नाही. कारण, पाकिस्तान भारतावर एक अणुबॉम्ब टाकत असेल तर भारत पाकिस्तानवर 20 अणुबॉम्ब टाकेल. मग, पाकिस्तान भारतावर 50 अणुबॉम्ब टाकण्यास तयार राहावे. मुळातच 20 अणुबॉम्ब पडल्यावर पाकिस्तान जगाच्या नकाशावर राहील का? असा प्रश्न त्यांनी धमक्या देणाऱ्यांना विचारला आहे.

Leave a Comment