फोटो गॅलरी; नयनरम्य अशा बालाकोटमध्ये होते जैशच्या क्रुर्म्यांचे वास्तव्य

balakota
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने काल सकाळी पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्धवस्त केले. भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिरच्या ज्या भागात हल्ले केले त्या ठिकाणचे नाव बालाकोट असे आहे. खैबर पख्तूनख्वाह प्रांतामध्ये बालाकोट हे असून हा परिसर खूप नयनरम्य असून येथील परिसर हा अत्यंत सुंदर आणि हिरव्या-गार झाडांनी सजलेला आहे.
balakota1
बालाकोटच्या ज्या परिसरात भारतीय हवाई दलाने जो हल्ला केला तो मानशेरा जिल्ह्यामध्ये येतो. भारताच्या मिराज 2000 लढाऊ विमानांनी बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर बॉम्ब हल्ला केला. सगळ्यात विशेष म्हणजे जैशच्या क्रुर्म्या दहशतवाद्यांनी निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या ठिकाणी आपले तळ तयार केले आहेत.
balakota2
भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचे वृत्त समोर आल्यानंतर नेमक्या कोणत्या बालाकोटमध्ये हल्ला झाला असा संभ्रम होता. पण नंतर हा हल्ला खैबर पख्तूनख्वाह प्रांताच्या बालाकोटमध्ये झाला याची पुष्टी करण्यात आली.
balakota3
8 ऑक्टोबर 2005ला झालेल्या भूकंपामध्ये बालाकोटचा परिसर उध्वस्त झाला होता. पण नुकतेच, सौदी पब्लिक असिस्टेंस आणि पाकिस्तानच्या सरकारच्या सहयोगाने हे शहर पुन्हा तयार करण्यात आले. बालाकोट शहरासंदर्भात आणखी खास बाब सांगायची झाली तर असे म्हटले जाते की, काश्मिरला जाण्यासाठी रानी नूरजहां बालाकोटच्या गढी हबिबुल्लाह खान शहरातून जाते.
balakota4
त्याचबरोबर अनेक दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प बालाकोटमध्ये चालवले जातात. तर इकडे भारताकडून केल्या गेलेल्या हल्ल्यानंतर बालाकोट परिसराला पाकिस्तानी सैन्याने पूर्णपणे घेरले आहे.

Leave a Comment