एरियल स्ट्राईक; मोदींवर टीका करुन ट्रोल झाली स्वरा भास्कर

swara-bhaskar
मंगळवारी पहाटे पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश-ए- मोहम्मदच्या तळावर भारतीय हवाई दलाने हवाई हल्ले करीत दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली. पंतप्रधान नरेंद मोदी ही कारवाई पार पाडेपर्यंत झोपलेच नव्हते. पाकिस्तानकडे भल्या पहाटे भारतीय हवाई दलाची विमानांनी कूच केली. त्यावेळी मोदी या कारवाईवर लक्ष ठेवून होते. कारवाईवर गेलेली सर्व विमाने सुखरुप परतल्यानंतर मोदींनी सर्व वैमानिकांचे अभिनंदन करून पहाटे साडेचारला पुढील कामांकडे वळले. सकाळी महत्त्वाच्या बैठका, मग राजस्थान दौरा आणि मग दिल्लीतील इस्कॉनचा कार्यक्रम असा दिवस कार्यक्रमांनी भरगच्च होता.


पण मोदींवर अभिनेत्री स्वरा भास्करने याच कारणावरून टीका केली आहे. त्यांचे हे कामच आहे नाही का? की आता यासाठी त्यांना अतिरिक्त गुण द्यायला हवे का? असे उपरोधिक ट्विट स्वराने केले आहे. मोदींच्या व्यस्त वेळापत्रकाची वृत्तपत्राच्या साइटवर प्रकाशित झालेली बातमी ट्विट करत स्वराने त्यांच्यावर निशाणा साधला. संबधीत वृत्तपत्राने ही पोस्टनंतर डिलीट केली. नेटकऱ्यांनी स्वराच्या या उपरोधिक टोल्यामुळे तिच्यावर निशाणा साधला आहे. हवाई दलाचे आणि पंतप्रधानांचे देशवासियांकडून कौतुक होत असताना तू उपरोधिक टीका करणे चुकीचे असल्याचे म्हणत नेटकऱ्यांनी तिला चांगलेच झापले आहे.

Leave a Comment