पोलादी सुरक्षित रेल्वेतून किम जोंग उन व्हिएतनाममध्ये दाखल

kimjong
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर दुसरी भेट घेण्यासाठी उ.कोरियाचा तानाशाह किम जोंग उन त्याच्या सुपरिचित पोलादी रेल्वेतून तब्बल ६० तासांचा प्रवास करून व्हिएतनाम येथे पोहोचला आहे. ट्रम्प- किम जोंग यांच्यातील दुसरी शिखर परिषद हनोई येथे २७-२८ फेब्रुवारीला होत असून तेथे किम जोंग कारने जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार किम जोन्गच्या बंद, बुलेटप्रूफ आणि सुरक्षित रेल्वेने प्योंगयंग ते डोंगडांग हा ४००० किमीचा प्रवास करण्यासाठी ६० तास घेतले. यापूर्वी हे दोघे नेते सिंगापूर मध्ये भेटले होते. व्हिएतनाम प्रवासात किम जोंगची बहिण किम यो जोंग आणि त्याचे काही विश्वासू अधिकारी रेल्वेत त्याच्या बरोबर होते. या रेल्वेने चीनमधून रात्रीच्या वेळी प्रवास केला तेव्हा त्याच्या रेल्वेचा मार्ग आणि लोकेशन गुप्त ठेवले गेले होते. चीनच्या डेंडोंग स्टेशनवर चीनी सेनेचा हाहारा होता आणि हा मार्ग अन्य वाहतुकीसाठी बंद केला गेला होता.

व्हिएतनाममधील डोंगडांग रेल्वेस्टेशनवर व्हिएतनाम सैनिक तैनात होते आणि बाजूच्या रस्त्यांवरची वाहतूक बंद केली गेली होती. हा सर्व परिसर सीलबंद केला गेला होता असे समजते.

Leave a Comment