जैश अतिरेक्यांचा काळ बनले सुदर्शन

lazer
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या काफिल्यावर हल्ला करून ४० जवानांचे प्राण घेणाऱ्या कृत्याला १३ दिवसात मुंहतोड जबाब देणाऱ्या भारतासाठी सुदर्शन खरोखरच सुदर्शन ठरले. १२ मिराज २००० लढाऊ विमानांनी पाकिस्तानातील जैश अतिरेक्यांचे मोठे तळ उध्वस्त करताना लेझर गायडेड बॉम्ब टाकून ३५० अतिरेक्यांचा खात्मा केला. यात वापरले गेलेले लेझर बॉम्ब संपूर्ण स्वदेशी बनावटीचे होते. २०१० मध्ये आयआरडीइ आणि डिआरडीओ यांनी तयार केलेल्या या लेझर बॉम्बचे नामकरण सुदर्शन असे केले गेले होते.

sudarshan
मिराज २००० ही विमाने कारगिल युद्धातही वापरली गेली होती. उंचावरून बॉम्ब टाकूनही लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची या विमानांची क्षमता असून सुदर्शन लेझर गायडेड बॉम्ब हे खास भारतीय हवाई दलासाठीच बनविले गेले आहेत. २००६ मध्ये हा प्रकल्प सुरु केला गेला होता आणि डीआरडीओने संशोधनातून ४५० किलोचे बॉम्ब अचूक टाकले जातील यासाठी लेझर गायडेड किट तयार केले. त्याचे पहिले परीक्षण २१ जानेवारी २०१० मध्ये ओडिशा येथील चांदीपूर तालावर झाले आणि ९ जून २०१० मध्ये पोखरण टेस्ट रेंज मध्ये त्याचा दोन चाचण्या झाल्या.

मिळालेल्या माहितीनुसार सुदर्शन लेझर गायडेड बॉम्ब प्रथम मिग २७ मध्ये सामील केले गेले. त्यानंतर आता ते मिग २९, मिराज, सुखोई, जग्वार यांच्यासाठी तसेच नेव्ही साठी वापरले जातात. या बॉम्बची रेंज ९ किमीची असून ती ५० किलोमीटरपर्यंत वाढविण्यासाठी काम सुरु आहे.

Leave a Comment