एरियल स्ट्राईक; पाकने गुंडाळले शेपूट

imran-khan
कराची – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामामध्ये जे काही घडले त्याचे आम्हाला अतीव दु:ख असून तिची चौकशी करण्यास व दहशतवादासंदर्भात चर्चा करण्यास आम्ही तयार असल्याची लोटांगण घालणारी भूमिका भारतासमोर जाहीर केली आहे. खान यांनी मोठ्या युद्धामध्ये नेहमी गणिते चुकतात असे सांगत पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, अमेरिकेच्या अफगाणिस्तान व व्हिएतनाममधील युद्धांचा दाखला दिला आहे.

इम्रान खान यांनी आपली भूमिका पाकिस्तानमध्ये झालेल्या वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांसमोर मांडली. भारतीय लष्कराचे ४१ जवान पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी तेराव्या दिवशी पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक करत जैश ए मोहम्मदच्या ३५० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धग्रस्त परिस्थिती ओढवली असून भारताने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पाकिस्तान मवाळ भूमिका घेताना दिसत आहे.

इम्रान खान यांनी पुलवामा प्रकरणाची चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगत एकप्रकारे शेपूट गुंडाळले असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना थारा देऊ नये असे सांगत अमेरिका व चीननेही भारताच्या बाजुने मत व्यक्त केल्यामुळे पाकिस्तान एकाकी पडल्याचे झाल्याचे दिसत आहे.

Leave a Comment