किसान क्रेडिट कार्डसाठी ऐवढे काम करा

kisan-credit-card
सरकारच्या बिनव्याजी शेतकरी कर्जाचा लाभ शेतकऱ्यांना घ्यायचा आहे असेल त्यांना किसान क्रेडीट कार्ड काढावे लागेल. तसेच 1 लाखावरून 1 लाख 60 हजार सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या बिनव्याजी कर्जाची मर्यादा केली आहे. अद्याप ही योजना लागू होण्यासाठी वेळ आहे. पण, या कर्जासाठी किसान क्रेडीट कार्ड लागते ही गोष्ट लक्षात ठेवा.

तुम्हाला कर्ज घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, 3 फोटो लागतील. तुम्हाला 1 लाखापर्यंतचे कर्ज जर हवे असेल तर जामीनदारची गरज लागणार नाही. पण, 1 लाखापुढील कर्जासाठी तुम्हाला जामीनदार द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर कर्जदाराच्या नावे जमीन असावी लागणार आहे.

3 लाखापर्यंतच्या कर्जावर 7 टक्के व्याज आकारण्यात येईल. पण तुम्ही वर्षाच्या आतमध्ये कर्ज फेडल्यास तुम्हाला व्याजात 3 टक्के सुट मिळेल. 1 हेक्टर जमिन तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 2 लाखापर्यंत लोन मिळेल. प्रत्येक बँकेची कर्ज मर्यादा वेगळी आहे. किसान क्रेडीट कार्डद्वारे तुम्ही पेसै देखील काढू शकता. शिवाय जवळच्या बँकेशी संपर्क साधल्यास तुम्हाला अधिक माहिती मिळेल.

Leave a Comment