राशिद खानची आणखी एका विश्वविक्रमाला गवसणी

rashid-khan
देहादून : आणखी एका विश्वविक्रमाला अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानने गवसणी घातली आहे. राशिद खानने आयर्लंडविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 4 चेंडूत 4 गडी बाद केले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये अशी कामगिरी करणारा राशिद खान हा पहिला गोलंदाज ठरला आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा विक्रम याआधी श्रीलंकेच्या लसीथ मलिंगाने केला होता. 2007साली खेळल्या गेलेल्या विश्वचषकात दक्षिण अफ्रिकेचे 4 गडी अवघ्या 4 चेंडूत श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने घेतले होते. राशिद खानच्या या कामगिरीमुळे अफगाणिस्तानचा तिसऱ्या टी-20 सामन्यात 32 धावांनी विजय झाला. त्याचबरोबर अफगाणिस्तानने ही मालिका 3-0ने जिंकली आहे.

यासामन्यात राशिद खानने 27 धावात देत 5 गडी बाद केले. राशिद खानने दुसऱ्यांदा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 गडी बाद केले आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी-20क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा राशिद खान हा सातवा खेळाडू ठरला आहे.

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या अफगाणिस्तानच्या संघाने 20 षटकांमध्ये 210 धावा केल्या. मोहम्मद नबीने सर्वाधिक 81 धावा केल्या, तर सलामीवीर हजरत्तुला झाझाईने ३१ धावांची खेळी केली. या दोघांचा अपवाद वगळता कोणत्याच अफगाणिस्तानच्या खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. अफगाणिस्तानच्या डावाची चांगली सुरुवात झाली. हजरत्तुला झाझाई आणि उस्मान घाणी या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. यानंतर ठराविक टप्प्याने गडी बाद होत गेले. आयर्लंडकडून बॉयड रैंकिन याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

Leave a Comment