हवाई दलाच्या कामगिरीनंतर नेटीझन्सकडून धन्यवाद अन् अभिनंदन

air-force3
नवी दिल्ली – पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिरमध्ये एरीयल स्ट्राईक केला आहे. भारतीय हवाई दलाच्या मिराज या लढाऊ विमानाने या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केला आहे. अनेक दहशतवाद्यांचा या हल्ल्यात खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारताच्या या हवाई हल्ल्यानंतर भारतीय सैन्याचे सोशल मीडियावरुन आभार मानण्यात येत आहेत. तसेच #josh, #Air strike, #indianairforce #balakot #surgicalstrike2 हे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत.

पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारताने दहशतवादी तळांवर एरीयल स्ट्राईक केला आहे. पाकिस्तानच्या बालाकोट येथील बहुतांशी दहशवादी तळ या हल्ल्यात उद्धवस्त करण्यात आले आहेत. हा हल्ला मिराज फायटर जेटच्या सहाय्याने करण्यात आला आहे. हा हवाई हल्ला पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी केला आहे. तसेच पाकिस्तानी विमानांनी भारताच्या विमानांना पळवून लावल्याचा दावाही केला आहे. मात्र, हा दावा करताना त्यांच्याकडून भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचे काही फोटोही शेअर करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. तसेच या हल्ल्याची बातमी येताच ट्विटरवर Air Strike नावाचा ट्रेंड सुरू झाला आहे.

Leave a Comment