एकाच फाईटमध्ये त्याने जिंकले होते तब्बल 1300 कोटी रुपये

floyed-mevedar
वॉशिंग्टन – बॉक्सर फ्लॉएड मेवेदर याला आपण अनडिसप्यूटेड किंग म्हणून ओळखतो. त्याबरोबर तो सोशल मीडियात आपल्या राहणीमानासोबतच त्याच्याकडे असलेल्या रग्गड पैशांमुळे देखील ओळखला जातो. 4 हजार कोटींहून अधिकचा मालक असलेल्या फ्यॉएड मेवेदरचा खर्च आणि बँक बॅलेन्स पाहिल्यास सर्वांना धक्का बसेल. तो बँकांमधून एकाचवेळी अब्जावधी रुपये बाहेर काढतो. त्याच्या घरी एवढी रोख रक्कम पाठविण्यासाठी बँकेकडून ट्रक पाठवले जातात. कॅश, कॅश आणि कॅश करणारा बॉक्सर मेवेदर झोपतानाही आपल्या जवळपास नोटा ठेवून झोपतो.
floyed-mevedar1
जेवण करत असो की विमानात प्रवास मेवेदर अगदी झोपताना सुद्धा आपल्या जवळपास नोटाच-नोटा ठेवण्याचा शौकीन आहे. तो कित्येक वेळा स्ट्रिपर्स क्लबमध्ये एकाचवेळा लाखो डॉलर हवेत उडवून येतो. त्याचा नोटांविषयी असलेला वेडेपणा पाहून लोक त्याला सायको देखील म्हणतात. त्याने आपल्या प्रोफेशनल बॉक्सिंग करिअरमध्ये आतापर्यंत 50 सामने खेळले आहेत. त्यापैकी एकही सामन्यात त्याचा पराभव झालेला नाही.
floyed-mevedar2
मिक्स्ड मार्शल आर्ट्सचा सुपरस्टार कोनोर मॅकग्रेगोरला ऑगस्ट 2017 मध्ये मेवेदरने सर्वात महागड्या फाइटमध्ये पराभूत करून 50 वा विजय मिळवला. त्याने या फाइटमध्ये 650 कोटी रुपये जिंकले होते. तसेच फ्लाएड मेवेदरवर या फाइटमध्ये 3832 कोटींचा सट्टा लावण्यात आला होता. मॅनी पॅक्वियाओला मेवेदरने 2015 मध्ये पराभूत केले होते. त्यामध्ये मेवेदरला तब्बल 1300 कोटी रुपये मिळाले होते.