आता शांत बसून चालणार नाही, आता घरात घुसून मारा

akshay-kumar
भारतीय हवाई दलाने आज पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई करत जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर मिराग 2000 विमानाच्या साह्याने बॉम्ब हल्ला केला. ही कारवाई करुन पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांचा बदला घेतला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या कारवाईनंतर देशभरातून भारतीय हवाई दलाचे कौतुक होत आहे. याच दरम्यान अभिनेता अक्षय कुमारनेही हवाई दलाचे कौतुक केले आहे.


दहशतवाद्यांच्या तळांचा नाश केल्याबद्दल मला तुमचा सार्थ अभिमान आहे, आता शांत बसून चालणार नाही. आता घरात घुसून मारा असे ट्विट करत अक्षयने हवाई दलाचे कौतुक केले आहे. १४ फेब्रुवारीला पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अक्षयने तीव्र शब्दात निषेध नोंदवला होता. या हल्ल्यानंतर अक्षयने अल्पावधीतच शहीदांच्या कुटुंबीयांसाठी मदतनीधी जमवला होता.

Leave a Comment