हवाई दलाच्या एरियल स्ट्राईकमध्ये 300 दहशतवादी यमसदनी

aerial-strike
श्रीनगर – भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी नियंत्रण रेषेजवळील (एलओसी) दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले असून जवळपास 300 दहशतवादी या हल्ल्यात ठार केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. दहशतवाद्यांच्या तळांवर १२ ‘मिराज-२०००’ लढाऊ विमानांनी हल्ला केला. दहशतवादी तळ या हल्ल्यात उद्ध्वस्त करण्यात आले.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मिनिटे ही कारवाई चालू होती. ३०० दहशतवादी त्यात ठार झाले. भारतीय हवाई दलाच्या मिराग 300 या विमानांनी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून १ हजार किलो वजनाचे बॉम्ब टाकले. जैशच्या तळांसह टेरर लॉन्च पॅडही बॉम्ब हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त झाले आहेत.

भारतीय लष्कराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यानंतर सर्वाधिकार दिले होते. मात्र, कारवाई लष्कराने केलेली नसून ती ‘इंटलिजेन्स बेस्ड’ असल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले आहे. कधीही दहशतवाद्यांच्या कारवायांना सहन केले जाणार नाही. त्यांचा हिशोब केला जाणार आणि बरोबरीत केला जाणार असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. याबाबत अमेरिकेचे अध्यध डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दहशतवाद विरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले होते.

Leave a Comment