लिम्का बुकमध्ये सामील झाली स्वादिष्ट पॅराडाइज बिर्याणी

biryani
अतिशय चविष्ट म्हणून प्रसिद्ध झालेल्या पॅराडाइज बिर्याणीने खवैयांच्या जिभेचा ताबा घेतानाच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. पॅराडाइज रेस्टॉरंटच्या हैद्राबाद शाखेने १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या वर्ष काळात तब्बल ७० लाख ४४ हजार २८९ प्लेट ग्राहकांना सर्व्ह करून हे रेकॉर्ड नोंदविले आहे. लिम्काच्या २०१९ च्या आवृतीत ही नोंद घेतली गेली आहे.

paradise
दुसरे म्हणजे मुंबई येथे झालेल्या आशिया फूड कॉंग्रेस मध्ये पॅराडाइजला रेस्टॉरंट सर्व्हिंग द बेस्ट बिर्याणी अॅवॉर्ड दिले गेले असून चेअरमन आली हेमातो यांना फूड, रेस्टॉरंट अँड होस्पिटॅलिटी सर्विस साठी मोठे योगदान दिल्याबद्दल लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरविले गेले आहे. पॅराडाइज रेस्टॉरंटचे सीईओ गौतम गुप्ता म्हणाले, लिम्का रेकॉर्ड आणि बेस्ट बिर्याणी असे दुहेरी बक्षीस मिळाल्याचे समाधान मोठे आहे. १९५३ मध्ये हे रेस्टॉरंट सुरु झाले ते एक कॅफे म्हणून. यावेळी तेथे फक्त चहा आणि स्नॅक्स मिळत असत. आता याचा पसारा खूपच वाढला आहे.

Leave a Comment