चेहरा सतेज आणि जवान दिसण्यासाठी करा फेस योगा

mudra
शरीर स्वास्थ्यासाठी योगाभ्यास अनेकजण करतात. पण चेहरा सतेज राहावा आणि त्यावर वय वाढल्याच्या खुणा उमटू नयेत यासाठीही काही खास योगाभ्यास करावा लागतो याची अनेकांना माहिती नसते. याला फेस योगा असे म्हटले जाते. आपला चेहरा छोट्या छोट्या अश्या विविध ५२ स्नायुपासून बनलेला असून फेस योगा करून या स्नायुंना विशेष व्यायाम दिला जातो, त्यामुळे ते टोन होतात, त्यांचा रक्तपुरवठा वाढतो आणि कोणत्याही ट्रीटमेंट शिवाय चेहरा तरुण आणि तजेलदार दिसतो. १५ दिवसात हा फरक जाणवतो.

singh
यासाठी काही आसने करावी लागतात. त्यात पहिले आहे सिंह मुद्रा. यात पाय दुमडून खाली बसायचे आणि मांडीवर दोन्ही हात ठेऊन जबडा खोलायाचा. तोंड पूर्ण उघडून जीभ शक्यतितकी खाली आणायची. यात जिभेला ताण बसला पाहिजे. त्यानंतर स्वस हेत घशामधून सिंहाच्या डरकाळीसारखा आवाज काढायचा. काही सेकंद थांबून पुन्हा हाच प्रयोग करायचा. यामुळे जीभ, घसा या भागातील रक्तपुरवठा सुधारतो आणि मान, छातीवर आलेला दबाव कमी होतो. चेहऱ्याचे स्नायू टोन होतात.

हनुवटी ओघळून डबल चीन झाली असेल तर गुढघ्यावर बसून मांडीवर हात ठवायचे आणि खांदे सैल सोडायचे. त्यानंतर जबडा पसरवून वर पाहायचे. १० सेकंद ही पोझ ठेवायची. नंतर पुन्हा ५-६ वेळा हाच व्यायाम करायचा. त्याने ओघळलेली हनुवटी पूर्वपदावर येते.

kissing
किसिंग मुद्रा गालांचा मसल टोन सुधारण्यास मदत करते. यात प्रथम तोंड मिटायचे आणि मोठे हसू येते तशी जिवणी रुंद करायची त्यानंतर कीस घेताना होतात तसे ओठ पुढे आणायचे. यामुळे चेहऱ्यावरच्या बारीक सुरकुत्याही कमी होतात आणि चेहरा तरुण दिसतो.

दोन्ही डोळे बंद करून त्याच्या बाहेरच्या कॉर्नरवर दोन्ही हाताचे अंगठे ठेवायचे आणि बाकी बोटे डोक्याच्या मागच्या बाजूला न्यायाची. मग डोळे बंद करून अंगठ्याच्या मदतीने स्कीन कानाच्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करायचा. यामुळे डोळ्याच्या बाजूंवर येणाऱ्या सुरकुत्या कमी होतात. हि आसने कोणत्याची वेळी करता येतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment