आता पाळीव कुत्रीही मधुमेह आणि रक्तदाबाची शिकार

dogs
माणसांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब या व्याधी वाढत आहेत हे नित्य प्रकाशित होत असलेल्या आकडेवारीवरून आपल्याला कळते पण विशेष म्हणजे माणसांच्या या व्याधींची लागण पाळीव कुत्र्यांना होऊ लागली असून त्यांच्यातही मधुमेह, उच्च रक्तदाब आणि थायरॉईड आजारांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे दिसून आले आहे.

सर्वसामान्य माणसाच्या लाइफस्टाइलमध्ये झालेले बदल जसे मधुमेह, रक्तदाब आणि थायरॉइड साठी कारणीभूत ठरत आहेत तसेच पाळीव कुत्रांची बदलती लाईफस्टाईल त्यांना या विकाराची शिकार बनवीत आहे असे प्राण्यांच्या डॉक्टरांचे मत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पाळीव कुत्रांचा आहार वाढला आहे. आहारात बदल झाला आहे मात्र त्या तुलनेत त्यांना व्यायाम काहीही नाही.

hyperten
कुत्रांमध्ये मधुमेह असण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात वेगाने वाढले असून आता १०० पैकी ५ कुत्री या व्याधीने ग्रस्त आहेत. वजन वाढ. लवकर थकणे, जादा भूक, शांत राहणे किंवा अधिक भुंकणे, वारंवार लाघवी अशी लक्षणे मधुमेही कुत्रांमध्ये दिसतात. कुत्री उच्च रक्तदाब आणि थायरॉईडनेही आजारी पडत असून हे प्रमाण गेल्या १० वर्षात वाढले आहे.

मधुमेह झालेल्या कुत्रांसाठी डायबेटिक डाएट बाजारात आली असून त्याची मागणी वाढते आहे. आजकाल कुत्री पाळण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र परिवारातील लोकांच्या वागणुकीचा परिणाम त्यांच्यावर होतो. त्यामुळे नुसते खाणे आणि आराम यापेक्षा कुत्र्यांकडून योग्य व्यायाम दररोज करून घेतला गेला पाहिजे असे डॉक्टर सांगतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment