राजकुमारी रीमा अमेरिकेत सौदीची राजदूत

princess
सौदी अरेबियाने शनिवारी अमेरिकेतील सौदीची राजदूत म्हणून राजकुमारी रीमा बिन बंदरा हिच्या नावाची घोषणा केली आहे. परदेशात महिला राजदूत नेमण्याची सौदीची ही पहिलीच वेळ आहे असे सांगितले जात आहे. पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येमुळे सौदीचे वॉशिंग्टन सोबत बिघडलेले संबंध पूर्ववत करण्यासाठी राजकुमारी प्रयत्न करेल असे सांगितले जात आहे.

अमेरिकेचे नागरिकत्व घेतलेल्या जमाल खाशोगी यांची इस्तंबूल मधील सौदी दुतावासात निर्घृण हत्या गेली गेली होती आणि त्याचे पडसाद जगभरात उमटले. अमेरिका आणि सौदी याच्या संबंधात त्यामुळे तणाव निर्माण झाले. सौदीने प्रथम खाशोगी त्यांच्या हत्येत त्यांचा संबंध असल्याचा इन्कार केला होता मात्र नंतर त्यांनी त्याचा स्वीकार केला होता. या हत्येने जगभरात झालेला हंगामा दाबून टाकण्यासाठी राजकुमारीची राजदूत म्हणून नेमणूक केली गेली असे म्हटले जात आहे.

अमेरिकन कायदा निर्मात्यांनी खाशोगी हत्येत सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान याला दोषी ठरवून त्याच्यावर कारवाई करावी असा आग्रह धरला होता कारण प्रिन्स सौदीचा रक्षा मंत्रीही आहे.

Leave a Comment