मेन्थॉल सिगारेट अधिक धोकादायक

वॉशिंग्टन – सध्या पाश्‍चात्य देशामध्ये मिंट सिगारेट किंवा मेन्थॉल सिगारेट पिण्याची ङ्गॅशन बोकाळत आहे. मुळात सिगारेट ओढणेच धोकादायक असते. त्यापेक्षा मेन्थॉलयुक्त सिगारेट ओढणे अधिक धोकादायक आहे असा इशारा अमेरिकेच्या ङ्गूड ऍन्ड ड्रग्स् ऍडमिनिस्ट्रेशन या यंत्रणेने दिला आहे. मेन्थॉल विरहित सिगारेट आणि मेन्थॉलयुक्त सिगारेट यांच्या दुष्परिणामांची शास्त्रशुध्द पाहणी झालेली नाही आणि मेन्थॉल सिगारेट ही कशी अधिक धोकादायक आहे याची आकडेवारी उपलब्ध नाही. परंतु मेन्थॉल सिगारेट ओढणारी व्यक्ती सिगारेटच्या जास्त आहारी जाण्याची शक्यता असते. हे मात्र पाहणीतून आढळले आहे.

अमेरिकेत मुळातच सिगारेट ओढण्याचे प्रमाण जास्त आहे आणि तिथे दरसाल चार लाख लोक तंबाखूच्या वापरातून होणार्‍या विकारांना बळी पडतात. आता सिगारेट ओढणार्‍या प्रौढांपैकी तीस टक्के आणि तरुणांपैकी ४० टक्के धूम्रपी हे मेन्थॉल सिगारेट ओढायला लागले आहेत. सिगारेटमुळे सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका आहे हे दिसत आहेच पण मेन्थॉल सिगारेटमुळे हा धोका किती गंभीर होईल याबाबत तज्ञांमध्ये शंका व्यक्त केली जात आहे.

मेन्थॉल सिगारेटच्या दुष्परिणामांची ङ्गार पाहणी करत बसण्यापेक्षा त्या सिगारेटचा वापर करणार्‍यांनी त्यापासून दूर रहावे असे आवाहन ङ्गूड ऍन्ड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने केले आहे शिवाय मेन्थॉल सिगारेटच्या दुष्परिणामांचा अभ्यासही करण्यास या यंत्रणेने गती दिली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment