भयावह इतिहास असलेले एडिनबर्ग

edinburgh
स्कॉटलंडची राजधानी आणि आता जगातील पर्यटकांचे आवडते ठरलेले एडिनबर्ग हे शहर अनेक कारणांनी प्रसिद्ध आहेच पण ते सर्वाधिक प्रसिद्ध आहे ते त्याच्या भयावह इतिहासासाठी. अर्थात या शहराची हि ख्याती आता इतिहासात जमा झाली असून या शहराचे आजचे वर्तमान वर्षभर उत्सव साजरे करणरे शहर असे आहे.

या शहराचा इतिहास अक्षरशः रक्ताने लिहिला गेला आहे असे म्हटले तर ते गैर ठरू नये. या शहराने अनेक भीषण युद्धे अनुभवली, महामारी सारखे भयानक साथीचे रोग अनुभवले. या साथीत आणि युद्धात अनेकांचे प्राण गेले आणि त्यामुळे येथे अंधश्रद्धा इतकी फैलावली कि त्यातून अनेकांना जिवंत जाळले गेले अनेकांचे रहस्यमय मृत्यू झाले.

edinburgh1
एडिनबर्गच्या जुन्या भागात म्हणजे कसब्यात भुतांच्या अनेक कहाण्या सांगितल्या जात आणि अनेक लेखकांनी त्याबद्दल त्यांच्या कथा कादंबऱ्यातून त्याचा वापर केला आहे. येथील अंधाऱ्या, चिंचोळ्या गल्ल्या, जुने वाडे, किल्ले, उभेच्या उभे जिने या साऱ्या कथांना पूरक ठरले आहेत. इथल्या हवेतच काही वेगळ्या शक्तीचा अनुभव येतो असे स्थानिक सांगतात. माजी लॉर्ड अड्वोकेत याचा आत्मा तेथे भटकतो असे मानले जाते. याचे थडगे येथे आहे.

असे सांगतात एकदा एक बेघर या मकबरयात रात्री झोपला तर त्याला या लॉर्डच्या आत्म्याने बेदम मारले त्यामुळे तो बेघर अर्धमेला झाला. तेव्हापासून या लॉर्डचा आत्मा येथे अजूनही भटकतो यावर लोकांचा विश्वास बसला असे सांगितले जाते.

Leave a Comment