कारच्या बाहेर येणाऱ्या एअरबॅग्ज देणार अधिक सुरक्षा

airbag
कारचा प्रवास प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित व्हावा यासाठी जगभरातून संशोधक प्रयत्नशील आहेत. कारसाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक सेफ्टी फीचर्स बनविली जात आहेत. एअर बॅग्ज असेच एक महत्वाचे फिचर. भविष्यात कारच्या बाहेर असलेल्या एअर बॅग्ज हे फिचर मिळू शकणार असून जर्मन फर्म झेडएफ फ्रेडरिशाफेन यांनी अश्या एक्स्टीरीअर एअरबॅग्ज बनविल्या आहेत. यामुळे कारला अन्य काही धडकाण्यापुर्वी या एअरबॅग्ज फुगतील आणि अपघातामुळे होणारे नुकसान खूपच कमी प्रमाणात होईल असा दावा केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या एअरबॅग्जच्या चाचण्या घेतल्या गेल्या असून त्या यशस्वी ठरल्या आहेत. कारच्या पुढे, मागे, साईडला या एअरबॅग्ज असून त्यामुळे कारची धडक झाली तरी आतील प्रवाशांना होणाऱ्या जखमा किरकोळ असतील. या साईड बॅग मोड्यूल कारच्या सिस्टीममध्येच असून सीट फ्रेमला जोडलेली आहे. सर्वसामान्यपणे सध्या कारला धडक बसली तर आतल्या एअरबॅग्ज फुगतात. नव्या टेक्निक मध्ये याच्या बरोबर उलट परिस्थिती असेल. म्हणजे टक्कर होण्यापूर्वीच बाहेरच्या एअरबॅग्ज फुगणार आहेत.

त्यासाठी यात उत्तम प्रकारच्या सेन्सर्सचा वापर केला गेला आहे. हे मल्टीसेन्सर असून त्यात रडार आहे. कारला धडकणारी वस्तू किती अंतरावर आहे, व किती वेळात धडकेल याचा अंदाज हा रडार घेतो तर यातील कॅमेरे धडकणाऱ्या वस्तूचे आकारमान आणि वजन याचा अंदाज देतो. कोणत्याची हवामानात सेन्सर काम करू शकतात. एकदा धडकणाऱ्या वस्तूचा अंदाज आला कि त्यानुसार कोणत्या एअरबॅग्ज फुलावायाच्या याचा निर्णय सेन्सर घेतो आणि त्याप्रमाणे कृती होते असे समजते.

Leave a Comment