या पाच देशात अब्जाधीश संख्या वेगाने वाढणार

wealth
एकूण सर्व जगभरात अब्जाधीशांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत असले तर आगामी पाच वर्षात म्हणजे २०२३ पर्यत पाच देशात या संख्येत वेगाने वाढ होणार असल्याचे अनुमान न्यू वेल्थ एक्स या संस्थेच्या संशोधन अहवालात व्यक्त केले गेले आहे. विशेष म्हणजे उभरती अर्थव्यवस्था म्हणून या देशांकडे पाहिले जात नाही.

हा अहवाल तयार करतना भविष्यातील गुंतवणूक विकल्प लक्षात घेतले गेले आहेत. त्यानुसार येत्या ५ वर्षात मध्य युरोप मध्ये अब्जाधीशांची संख्या १० टक्क्यांनी वाढेल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. या यादीत सर्वात प्रथम क्रमाकावर नायजेरिया हा देश आहे. या देशातील अब्जाधीशांची संख्या जगात सर्वाधिक वेगाने म्हणजे १६.३ टक्क्याने वाढते आहे.

या खालोखाल दोन नंबर मोठा ऐतिहासिक वारसा असलेला इजिप्त हा देश आहे. त्यांच्या देशात अब्जाधीशांच्या संख्येत १२.५ टक्क्यांनी तेजी दिसते आहे. ३ नंबरवर भारताचा शेजारी बांगलादेश असून या देशाच्या अब्जाधीश संख्येत येत्या पाच वर्षात ११.४ टक्क्याने तर चार नंबरवर असलेल्या व्हिएतनाममध्ये हीच वाढ १०.१ टक्के असेल. या देशात पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर होत आहे.

या यादीत मध्ये युरोपातील पोलंड पाचव्या स्थानावर आहे. तेथे येत्या पाच वर्षात अब्जाधीशांच्या संख्येत १० टक्के वाढ अपेक्षित आहे. या यादीत पहिल्या १० मध्ये भारताचे स्थान ८ वे असून आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हे भारतीय आहेत. भारतात येत्या पाच वर्षात अब्जाधीशांच्या संख्येत ९.७ टक्के वाढ होईल असे हा अहवाल सांगतो.

Leave a Comment