ब्रुसेल्स येथील चवदार चॉकलेट महोत्सव

brussels
बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे २२ ते २४ फेब्रुवारी दरम्यान ६ व्या आंतरराष्ट्रीय चॉकलेट महोत्सवाचे आयोजन केले गेले आणि त्यात १५ देशातील १३० नामवंत चॉकलेट उत्पादक कंपन्या सामील झाल्या. यात पेस्ट्री शेफ, कन्फेक्शनर्स, डिझायनर्स यांनी त्याच्या कलेचे सुंदर दर्शन घडविले. या महोत्सवात चॉकलेटची पिस्तुले, कॅमेरे, ग्रेनेड, हातोड्या, बूट, मानवी कवट्या, पेन्स, प्राणी, पक्षी इतकेच नाही तर चॉकलेटचे कपडे सादर केले गेले.

chocolate
यात काही कंपन्यांनी खास या महोत्सवासाठी खास प्रकार बनविले आणि ते जगात फक्त येथेच विक्रीसाठी होते. ८ हजार चौरस मीटर परिसरात चॉकलेट निर्मात्यांनी स्टॉल्स लावले होते. बेल्जियम हा चॉकलेटचा प्रमुख उत्पादक देश असून येथे दरवर्षी ७,२५००० टन चॉकलेट तयार होते. येथील ब्रुसेल्स विमानतळावर दर मिनिटाला १.६ किलो चॉकलेट विकले जाते. १७ व्या शतकापासून हा उद्योग येथे सुरु असून १९ व्या शतकात त्याची वेगाने वाढ झाली. जीओन मार्केट रिसर्च अहवालानुसार २१०७ मध्ये जगात चॉकलेट बाजाराची उलाढाल ७.२५ लाख कोटींची होती आणि त्यात दरवर्षी वाढ होत आहे.

Leave a Comment