आकाश अंबानीची बॅचलर पार्टी स्वित्झर्लंडमध्ये सुरु

aakash
देशातील सर्वात बडे उद्योजक मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश ९ मार्च रोजी बालमैत्रीण आणि हिरे उद्योजक रसेल मेहता यांची कन्या श्लोका बरोबर विवाहबद्ध होत आहेत. अंबानी परिवाराने आकाशची बॅचलर पार्टी स्वित्झर्लंड मधील सेंट मोर्टेज या पंच तारांकित हॉटेल मध्ये मोठ्या धडाक्यात २४ आणि २५ फेब्रुवारीला आयोजित केली. त्यात आकाश यांच्या खास मित्रांना बोलावले गेले होते.

सुमारे ५०० पाहुण्यांसाठी हि पार्टी होती आणि त्यासाठी भारतातून दोन मोठी खासगी जेट विमाने आरक्षित केली गेली होती. या पार्टीत रणबीर कपूर, करन जोहर, प्रियांका चोप्रा सह अनेक बॉलीवूड सेलेब्रिटी सामील झाल्याचे समजते. आल्प्स पर्वत रांगाच्या कुशीत वसलेले सेंट मोर्टेज हे रिसोर्ट शहर म्हणून ओळखले जाते. अंबानी यांनी बुक केलेल्या सेंट मोर्टेज या पंच तारांकित हॉटेलातील एका खोलीचे भाडे १ लाखपासून तीन लाखापर्यंत आहे. हॉटेल मधील बहुतेक खोल्या अंबानी परिवाराने बुक केल्या आहेत.

या पार्टीबरोबर आकाश यांच्या विवाह कार्यक्रमाना सुरवात झाली आहे. ८ मार्च रोजी संगीत सेरेमनी असून त्यासाठी अमेरिकन पॉप रॉक बँड आमंत्रित केला गेला आहे असे समजते. मरुन फाईव्ह हा आकाश आणि श्लोका या दोघांच्या आवडता परफोर्मर असून या बँड मध्ये सात सदस्य आहेत. ४० मिनिटांच्या कार्यक्रमासाठी ते १० लाख डॉलर्स घेतात असे समजते. आकाशच्या संगीत सेरेमनीमध्ये ते परफोर्म करणार आहेत.

Leave a Comment