यापुढे करु शकता येणाऱ्या आक्षेपार्ह मेसेज विरोधात तक्रार

social-media
नवी दिल्ली – सध्याचे युग हे डिजिटल आहे असे म्हटले तर अतिशोयक्ती ठरु नये. त्यात तर सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय आहे. पण सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या काही आक्षेपार्ह मेसेजमुळे कधी कधी आपली नाचक्की देखील होऊ शकते. यापूर्वी अशा मेसेजबाबत तक्रार करण्याची कोणातीही सुविधा नव्हती. पण यापुढे व्हॉट्सअॅप अथवा सोशल मीडियावरून आलेले धमकीचे अथवा आक्षेपार्ह मेसेजच्या विरोधात तक्रार करता येणार आहे. पण त्याबाबत नेमकी कुठे तक्रार करावी, असा प्रश्न निर्माण करण्यात येत होता. यापुढे असे आक्षेपार्ह एसएमएस आल्यास पीडित व्यक्तीला दूरसंचार विभागाकडे तक्रार करता येणार आहे.

ही तक्रार करण्यासाठी तुम्हाला आलेल्या आक्षेपार्ह अथवा धमकीचा मेसेज स्क्रीनशॉट काढून [email protected] ईमेलवर पाठवावा. दूरसंचार विभागाचे पोलीस तक्रारीसह दूरसंचार कंपन्याकडून कारवाईसाठी प्रयत्न करणार आहे. याबाबतचे ट्विट दूरसंचार विभागाचे माध्यम नियंत्रक आशिष जोशी यांनी केले. अनेक माध्यम प्रतिनिधी, प्रसिद्ध व्यक्तींना सोशल मीडियातून धमकींचे मेसेज आल्याच्या तक्रारी केल्या होत्या. दूरसंचार विभागाने आक्षेपार्ह मेसेजबद्दल कारवाई करणार असल्याचे १९ फेब्रुवारीला जाहीर केले होते. याबाबतचे आदेश दूरसंचार कंपन्यांना देण्यात आले आहेत.

Leave a Comment