जिओ युझर्स आता एकावेळी 10 जणांशी बोलू शकतात

Jio
मुंबई : टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने प्रवेश केल्यापासून अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यातच जिओ एकापेक्षा एक भन्नाट ऑफ सोबतच आपल्या युझर्ससाठी अनेक फिचर्स देखील आणत आपल्या युझर्सला आश्चर्यचा धक्का देत असते. आता यावेळी जिओने युजर्ससाठी एक नवीन अॅप लाँच केले आहे. ज्यामुळे जिओ युजर्स आता एकाचवेळी दहा जणांसोबत ग्रुप कॉलिंग करु शकतात. गुगल प्ले स्टोअरमध्ये रिलायंस जिओ तर्फे ‘जिओ ग्रुप टॉक’ हे नवीन अॅप अपलोड करण्यात आले आहे. युजर्स या अॅपच्या मदतीने ग्रुप कॉन्फरंस कॉल करु शकतात.

ज्या युजर्सकडे फक्त जिओचे सिमकार्ड आहे. फक्त तेच या अॅपचा वापर करु शकतात. अॅप इनस्टॉल करताच युजर्सला जिओ नंबरच्या सहाय्याने व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करावी लागते. यासाठी तुमच्या फोनवर कॉलिंग आणि एसएमएस सर्व्हिस सुरु असणे गरजेचे आहे. रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झाल्यावर अॅपचा वापर तुम्ही करु शकता.

जिओ ग्रुप टॉक हे एक मल्टीपल पार्टी कॉलिंग अॅप्लिकेशन आहे. एकाचवेळी 10 लोकांना यामध्ये कॉल केला जाऊ शकतो. कॉलिंगसोबत यामध्ये कॉन्फरंस कॉल शेड्यूलचा पर्याय ही दिला आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही एक-एक अॅड करण्यापेक्षा एकाचवेळी दहा लोकांना अॅड करुन कॉल करु शकता. या अॅपच्या सहाय्याने कुणी कॉलर, व्हॉईस कॉलच्या दरम्यान कोणत्या दुसऱ्या युजर्सला अॅड किंवा रिमूव्ह करु शकता. यामध्ये लेक्चर मोडही दिला आहे. या मोडच्या दरम्यान फक्त एक युजर बोलू शकतो आणि बाकीचे फक्त ऐकू शकतात.

एचडी व्हॉईस कॉलिंगला हे अॅप सपोर्ट करते. सुरुवातीला हे अॅप व्हॉईस कॉलिंगसाठी सुरु केले आहे, पण त्यात लवकरच व्हिडीओ कॉलिंग आणि चॅटिंगसारखे फीचर अॅड केले जातील. सध्या या अॅपची चाचणी सुरु असून लवकरच हे अॅप लाँच केले जाईल. सध्या अँड्रॉईड युजर हे जिओ ग्रुप टॉक अॅप डाऊनलोड करु शकतात. आईओएस युजर्ससाठी हे अॅप उपलब्ध नाही.

Leave a Comment