अशी ओळखा रिलेशनशिपमध्ये धोका देणारी व्यक्ती

relation
आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम करतो, त्याच्यासोबत जन्मोजन्मी सोबत राहण्याच्या आणाभाका देखील खातो. पण अचानक आपली प्रिय व्यक्ती जेव्हा आपल्याला धोका दिला तर त्याचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतो. त्यानंतर त्या व्यक्तीचे होणारे हाल हे काही आपल्याला नव्याने सांगायला नको. पण आज आम्ही तुम्हाला धोकेबाज कसे ओळखाल याची माहित देणार आहोत.
relation1
एका ऑनलाइन मार्केट सर्वेक्षणानुसार पाच व्यक्तींच्या मागे एक धोकेबाज व्यक्ती असते हे वास्तव समोर आले आहे. पण त्याला काही व्यक्ती अपवाद ठरतात. जे आपल्या प्रियव्यक्तीला कधीच धोका देऊ शकत नाही.
relation2
सर्वेक्षणानुसार ज्याला फसवणूक करण्याची सवय आहे तो व्यक्ती कायमच तसा असतो, म्हणजेच तो आपल्या वागण्यात कधीच सुधार करत नाही. जे लोक एकदा धोका देतात, त्यांचे धोका देण्याचे आणखी कमीत – कमी तीन चान्स असतात. कारण एकदा धोका देणारी व्यक्ती त्या गोष्टीला जस्टिफाय करणे शिकलेली असते. त्यामुळे धोका देणे त्या व्यक्तीसाठी सोप आणि सहज शक्य होते
relation3
धोका देण्यामध्ये वय देखील जबाबदार असते. ऑनलाइड डेटिंग साइटच्या संशोधनानुसार, महिलांचे दगा देण्याचे सरासरी वय ३६ वर्ष असते. रिसर्चनुसार ३० वय असलेल्या व्यक्तींमध्ये दगा देण्याची शक्यता अधिक असते. सोशल, सायकॉलॉजी अँड पर्सनॅलिटी सायन्यमध्ये रिसर्चनुसार, पॉर्न बघणाऱ्या पुरुषांमध्ये धोका देण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते.
relation4
दगा देण्यासाठी जीन्स जबाबदार असल्याचे अनेक रिसर्चमधून समोर आले आहे. या रिसर्चनुसार दगा देणाऱ्या लोकांमध्ये ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रोसिनचे रिसेप्टर कमी असतात. जे सेक्सनंतर बॉन्डिंगसाठी जबाबदार असतात. यामुळे लोक कोणतीही अटॅचमेंट नसतानाही कुणाशीही शारीरिक संबंध ठेवू शकतात.
relation5
जर्नल ऑफ सेक्सच्या एका स्टडीनुसार, जे लोक चांगल्या पदावर नोकरीवर असतात त्यांची दगा देण्याची शक्यता अधिक असते. पॉवरफुल नोकरी असल्याने त्या व्यक्तीमध्ये जास्त आत्मविश्वास येतो आणि त्यामुळे त्यांना वाटत असते की ते फसवणूक करुन त्यातून ते सहज बाहेर पडू शकतात.

Leave a Comment