म्हणून अन्य भारतीयांशी लग्न करत नाहीत काश्मिरी मुली

wedding
जम्मू काश्मीर मध्ये जेव्हा केव्हा लष्कर, जवान, नागरिकांवर दहशदवादी हल्ले होतात तेव्हा तेव्हा काश्मीर मध्ये लागू असलेले ३७० कलम रद्द करावी अशी मागणी जोर धरते हे आपण नित्य पाहतो, ऐकतो. पण आपल्याला हे ३७० कलम नक्की काय आहे याची माहिती बरेचदा नसते. जम्मू काश्मीर मधील विवाहयोग्य महिला भारताच्या अन्य राज्यातील तरुणांबरोबर विवाह करताना दिसत नाहीत यामागे हे कलमही कारणीभूत आहे याची अनेकांना माहिती नसेल.

३७० या विशेष कलमामुळे जम्मू काश्मीर भारताच्या अन्य राज्यांपेक्षा वेगळे ठरले आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे या कलमामुळे काश्मिरी जनतेला दुहेरी नागरिकत्व मिळाले असून अन्य कोणत्याची राज्यातील नागरिकांना ही सुविधा नाही. येथील मुली अथवा महिलांनी अन्य राज्यातील नागरिकांशी विवाह केला तर त्यांचे काश्मिरी नागरिकत्व रद्द होते मात्र त्यांनी पाकिस्तानी नागरिकाशी विवाह केला तर त्या पाकिस्तानी नागरिकाला काश्मिरी नागरिकत्व मिळते.

kashmir
काश्मीर मध्ये भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकवला जात नाही. या राज्याचा स्वतःचा स्वतंत्र ध्वज आहे. भारतीय तिरंग्याचा अपमान काश्मिरी जनतेने केला तरी त्यांना शिक्षा होऊ शकत नाही कारण तो गुन्हा मानला जात नाही. काश्मिरी महिलांना शरियत कायदा लागू आहे पण अन्य राज्यातील मुस्लीम महिलांना तो लागू नाही. भारताचे नियम कायदे काश्मिरी जनतेला लागू नाहीत. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे. काश्मीर मध्ये विधानसभा मुदत ६ वर्षे आहे. भारताच्या बाकी राज्यासाठी ही मुदत ५ वर्षे आहे.

Leave a Comment