जगाच्या इतिहासात महागडी ठरणार 2019 लोकसभा निवडणूक

elect
यंदाच्या वर्षात भारतात होत असलेल्या लोकसभा निवडणुका केवळ भारताच्याच नाही तर जगातील निवडणूक इतिहासात सर्वात महागड्या असतील असा अंदाज अमेरिकेतील निवडणूक तज्ञ व्यक्त करत आहेत. लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखा संदर्भात घोषणा केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्निज एंडाऊमेंट फोर इंटर्नल पीस थिंक टँक मध्ये द. आशियाई प्रोग्रामचे मिलन वैष्णव बोलत होते.

वैष्णव म्हणाले, अमेरिकेत २०१६ च्या निवडणुकात ६.५ अब्ज डॉलर्स म्हणजे ४६२७६ कोटी खर्च केले गेले होते तर भारतात २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकात ५ अब्ज डॉलर्स म्हणजे ३५५९२ कोटी खर्च केले गेले होते. यंदा हा खर्च आणखी वाढणार यात शंका नाही. कारण सध्या भारतात अनिश्चिततेचे वातावरण आहे. भाजप आणि विरोधी पक्षातील जागा अंतर फार नसेल असे दिसते आहे अश्यावेळी निवडणूक खर्च वाढतो असा अनुभव आहे.

वैष्णव गेली काही भारतीय निवडणूक फंड विश्लेषण करत आहेत. ते म्हणाले, निवडणूक खर्च हा सर्वच राजकीय पक्षांचा अविभाज्य भाग बनला आहे आणि देशातील नागरिकांनीही ते स्वीकारले आहे. हा पायंडा योग्य नाही तर दुःखदायक आहे. त्यात राजकीय नेते जसे सामील आहेत तसेच राजकीय पक्षांचे देणगीदारही सामील आहेत. या कोणत्याच प्रकारात पारदर्शिता नाही. राजकीय पक्षांना कुणी किती देणग्या दिल्या याचा शोध घेणे अवघड आहे. त्यामुळे प्रत्यक्षात खर्चाचे जे आकडे दाखविले जातात त्याहून कितीतरी अधिक खर्च केला गेलेला असतो हे सत्य आहे.

Leave a Comment