आयपीएल ओपनिंग सेरेमनी नाही, पैसे शहीद फंडासाठी देणार बीसीसीआय

ipl2019
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशदवादी हल्ल्यामुळे भारतचा जनआक्रोश वाढता राहिला असून आता बीसीसीआयने या संदर्भात मोठा निर्णय शुक्रवारी जाहीर केला आहे. आगामी आयपीएल २०१९ चा उद्घाटन सोहळा रद्द केला गेला असून या सोहळ्यासाठी होणारा खर्च पुलवामा शहिदांच्या परिवारासाठी मदत म्हणून दिला जाणार आहे.

दरवर्षी आयपीएल उद्घाटनाचा भव्य रंगारंग सोहळा साजरा केला जातो आणि त्यात अनेक बॉलीवूड सेलेब्रिटी परफोर्म करतात. यंदा हा सोहळा होणार नाही असे बीसीसीआयच्या कमिटी ऑफ अॅडमिनीस्ट्रेशन चे सदस्य विनोद राय यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी ते म्हणाले वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान बरोबर खेळायचे का नाही याचा निर्णय सरकारवर सोपविला गेला असून सरकारच निर्णय आम्ही मान्य करणार आहोत. पुलवामा हल्ल्यानंतर काही खेळाडू पाक बरोबर खेळू नये असे मत व्यक्त करत आहेत तर काही जणांनी पाक बरोबर न खेळण्यात आपले नुकसान आहे असेही मत व्यक्त केले आहे.