सचिन पुलवामा शहीद फंडासाठी मारणार पुशअप्स

sachin
भारताचा मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर रविवारी दिल्ली येथे होत असलेल्या मॅरेथॉन शर्यतीपूर्वी जवाहरलाल नेहरू स्टेडीयम मध्ये पुलवामा शहीद जवान परिवारासाठी आयोजित केलेल्या कीप मुव्हिंग पुशअप चॅलेंज मध्ये अन्य धावपटूसह पुशअप मारणार आहे.

रविवारी दिल्लीत चार प्रकारच्या मॅरेथॉन स्पर्धा होत असून त्याचा उद्देश पुलवामा शहीद जवान परीवारांसाठी धन जमा करणे असा आहे. त्यासाठी हॅशटॅग कीप मुव्हिंग पुशअप चॅलेंज आयोजित केले गेले आहे. यात सामील स्पर्धक प्रत्येक पुशअप साठी १०० रु. दान केले जाणार आहेत. ही रक्कम शहीद फंदात जमा केली जाईल. सचिन म्हणाला, प्रत्येकाने आपली क्षमता ओळखून त्याला आव्हान दिले पाहिजे. स्वतःची स्वतःशी स्पर्धा हा यशाचा मंत्र असतो कारण यात आपणच आपले प्रतिस्पर्धी असतो. या स्पर्धेत माझ्याबरोबर सामील व्हा आणि आरोग्यपूर्ण आयुष्याची पायाभरणी करा.

Leave a Comment