श्रीदेवीच्या कोटा साडीचा लिलाव करणार बोनी कपूर

shreedevi
बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी हिचे गेल्या २४ फेब्रुवारीला दुबई येथे अचानक निधन झाल्याचा चटका रसिक अजून विसरलेले नाहीत. श्रीदेवीच्या निधनाला वर्ष होत असून त्यानिमित्त तिचे पती बोनी कपूर यांनी श्रीदेवीच्या खास आवडीच्या कोटा साडीचा ऑनलाईन लिलाव करण्याचा निर्णय घेतला असून यातून मिळालेली रक्कम कन्सर्न इंडिया फाउंडेशन या महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गरीब लोकांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला देणार असल्याचे जाहीर केले आहे.

हा लिलाव परीसेरावर केला जात असून त्यासाठी वेगळे वेबसाईट पेज तयार करून ते श्रीदेवीला अर्पण केले गेले आहे. त्याला बिईंग जेनरस वुईथ श्रीदेवी अशी टॅगलाईन दिली गेली आहे. साईटवर लिलाव केल्या जाणाऱ्या साडीचे फोटो दिले गेले असून त्यासाठी बेस प्राईस ४० हजार रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्ताच या साडीसाठी १ लाख ३० हजाराची बोली लागली आहे.

Leave a Comment