व्यसनी पोपटांमुळे शेतकरी हैराण

parrot
माणसे नशेच्या अधीन जातात यात नवल नाही मात्र पक्षीही नशेच्या अधीन जातात आणि त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठे नुकसान सोसावे लागते याचा अनुभव राजस्थान मधील शेतकरी दरवर्षी घेत असतात. राजस्थानातील मंद्सोर जिल्यात अफूची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. या पासून खसखस मिळते आणि मारीजूआना सारखे मादक पदार्थही काही देशात तयार केले जातात.

राजस्थानांत अफूची शेती कायदेशीररित्या केली जाते. सध्या अफूची बोंडे शेतात तयार झाली असून या बोंडातून चिक काढून त्यापासून अनेक उत्पादने घेतली जातात. या बोंडातून बाहेर पाझरणारा चिक मादक असतो आणि पोपटांना हा चिक प्रचंड आवडतो. इतका कि पोपट व्यसनी बनले आहेत. या बोंडांवर चाकू किंवा धारदार वस्तूने चीर दिली कि त्यातून हा चिक बाहेर येतो. तो तसाच ठेवला कि घट्ट होतो. नंतर तो काढून घेतला जातो. पोपट चिरा दिलेल्या बोंडांवर अक्षरशः तुटून पडत आहेत आणि त्यांचे नुकसान करत आहेत.

opium
अफूची बोंडे तयार होऊ लागली कि चोरांचा उपद्रवही वाढतो असे शेतकरी सांगतात. पण यंदा त्यांना चोरांपेक्षा पोपट धाडीचे भय अधिक असून शेतावर रात्रभर राखण ठेवण्याची पाळी आली आहे. घट्ट झालेला चिक एकत्र करून शेतकरी तो विकतात. या चिकाचा स्वाद पोपटाना चांगलाच कळला असून बोंडांवर चीर दिली कि पोपट त्यावर तुटून पडत आहेत परिणामी आमचे नुकसान होत आहे असे शेतकरी सांगतात.

Leave a Comment