बंदी उठली, सॅरिडॉनची डोकेदुखी संपली

saridon
पिरामल एन्टरप्रायझेसचे उत्पादन सॅरिडॉन या वेदनाशामक औषधावर फिक्स डोस कॉम्बिनेशन अंतर्गत गतवर्षी सप्टेंबरमध्ये घालण्यात आलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठविली असून पिरामल एन्टरप्रायझेस ला जैसे थे आदेश दिला आहे. परिणामी सॅरिडॉन चे उत्पादन आणि विक्री कंपनी करू शकणार असल्याचे कंपनीच्या एक्सिक्युटीव्ह डायरेक्टर नंदिनी पिरामल यांनी सांगितले. एकप्रकारे या आदेशाने सॅरिडॉन चीच डोकेदुखी संपली असल्याचे त्या म्हणाल्या.

नंदिनी पिरामल म्हणाल्या सॅरिडॉनवर फिक्स डोस कॉम्बिनेशन अंतर्गत असलेली बंदी उठेल याची खात्री होतीच. हा आमचा कायदेशीर विजय आहे. भारतात गेली ५० वर्षे सॅरिडॉनवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा ग्राहक सेवेसाठी सज्ज आहोत. भारतात सॅरिडॉन हे सर्वाधिक वितरीत होणारे वेदनाशामक असून देशात ९ लाख आउटलेट मधून त्याची विक्री होते.

नेल्सनचा अहवालानुसार भारतात दर सेकंदाला सॅरिडॉनच्या ३१ गोळ्या विकल्या जातात. डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी, पडसे यावर ही गोळी गुणकारी आहे

Leave a Comment