चीनने लाँच केली जगातील पहिली एआय बेस्ड लेडी न्यूज रीडर

anker
चीनने आर्टीफीशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच वापर करून तयार केलेली पहिली महिला न्यूज अँकर सादर केली असून तिचे नामकरण शिन शाओमेंग असे केले गेले आहे. मंगळवारी सरकारी न्यूज चॅनलवर या न्यूज अँकरने बातम्या वाचल्या असे समजते. अर्थात यामुळे न्यूज रीडर्सच्या नोकऱ्यांवर गदा येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मार्च मध्ये चीनमध्ये होत असलेल्या द्विपक्षीय राजनीतिक बैठकीत ही एआय बेस्ड लेडी न्यूज रीडर अधिकृत डेब्यू करणार आहे. यापूर्वी शिन्हुआ ने नोव्हेंबर २०१८ मध्ये जगातील पहिला एआय बेस्ड मेल न्यूज रीडर सादर केला होता. त्यानंतर या एआय बेस्ड मेल न्यूज रीडरने १० हजार मिनिटात ३४०० बातम्या वाचल्या असे जाहीर करण्यात आले आहे.

Leave a Comment