भांग –प्रमाणात घेतले तर औषध अन्यथा विष

bhang
महाशिवरात्र आता अगदी तोंडावर आली असून देशातील हजारो शिवमंदिरातून या दिवसाची तयारी सुरु आहे. भोलेनाथ शंकराला भांगेचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आपल्याकडे आहे. वाटून केलेली भांग जिला घोटा म्हटले जाते ती अति प्रमाणात सेवन केली तर माणसाच्या मेंदुवरचे नियंत्रण जाते याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. मात्र हीच भांग जर प्रमाणात घेतली गेली तर ती औषधी आहे आणि त्याचे विविध विकारांवर चांगले फायदे होतात.

आयुर्वेदाप्रमाणे भांगेत कर्बोदके, प्रथिने, मँगनीज, इ जीवनसत्व, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासह अनेक पोषक तत्वे आहेत. योग्य प्रमाणातील भांगेचे सेवन रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित करते आणि रक्तशुद्धी होते. मात्र भांगेचे जादा सेवन केल्यास मेंदुवरचे नियंत्रण सुटते. योग्य प्रमाणातील सेवनामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. भांगेतील फॅटोअॅसिड पार्किन्सन्स, अल्झायमर अश्या व्याधींपासून बचाव करते.

seeds
भांगेच्या बियांमधील तेल त्वचा मसाज करण्यासाठी वापरावे. त्यामुळे त्वचेचा शुष्कपणा कमी होतो आणि त्वचा चमकदार आणि नितळ बनते. या बिया रक्तशर्करा नियंत्रित करतात कारण त्या चांगली वसा आणि ग्लुकोज शोषून घेण्यास तसेच गरजेनुसार पुन्हा ग्लुकोजमध्ये परिवर्तन करण्यास सक्षम असतात. या विरघळणाऱ्या तंतूंचे प्रमाण खूप आहे त्यामुळे पचन सुधारते आणि पोट साफ राहते. शिवाय यामुळे भूक नियंत्रित राहते. परिणामी वजन कमी होते.

बियांचे सेवन आतड्याच्या कॅन्सरला प्रतिबंध करतात. मॅग्नेशियम सारख्या खनिजांमुळे झोप चांगली लागते. या बियांच्या सेवनामुळे थायरॉइड आणि जाथारालातील हार्मोनचे संतुलन राखले जाते. यातील लीनोनेनिक अॅसिड मुळे हार्मोनचे असंतुलन कमी होऊन चिंता, महिलांमधील मेनापॉझ चा त्रास कमी होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment