विडींजच्या फलदांजांनी एकाच डावात ठोकले तब्बल 23 षटकार

west-indies
सध्या वेस्ट इंडिज इंग्लंड विरुद्ध 5 एकदिवसीय सामन्याची मालिका खेळत असून नुकत्याच झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी एका आगळ्यावेगळ्या विक्रमला गवसणी घातली आहे. पण 361 धावांचा डोंगर उभा करुनही वेस्ट इंडिज संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडच्या संघाने जेसन रॉय आणि जो रुटच्या शतकी खेळाच्या जोरावर 361 धावांचे आव्हान सहज पार केले.

तत्पूर्वी गेल्या महिन्यांपासून संघाच्या बाहेर असणाऱ्या धाडक फलंदाज ख्रिस गेलने या सामन्यात पुनरागमन करत 135 धावांची शतकी खेळी केली. या सामन्यात गेलसह अन्य फलंदाजांनी देखील मैदानावर षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडला.

वेस्ट इंडिजच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना तब्बल 23 षटकार लगावले. त्यातील 12 षटकार एकट्या ख्रिस गेलेच्या नावे आहेत. त्याचबरोबर वेस्ट इंडिजच्या संघाने सर्वाधिक षटकार ठोकण्याचा न्युझीलंडच्या नावे असलेला विक्रम मोडीत काढला आहे.

आदिल रशिदच्या गोलंदाजीवर विंडीजच्या नर्सने लाँग ऑनवरुन षटकार खेचत विंडीजला विक्रम साधून दिला. ख्रिस गेलने याच सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीलाही मागे टाकले.

Leave a Comment