भीक मागणाऱ्या महिलेची शहीदांच्या कुटुंबियांना ‘लाख’ मोलाची मदत

donate
अजमेर : जम्मू-काश्मिरमधील पुलवामात झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशातील प्रत्येक नागरिक कोणत्या ना कोणत्या मार्गाने भारतीय लष्कराची मदत करण्यासाठी सरसावत आहे. त्यातच राजस्थानातील एका भिकारी महिलेने आपल्या समोर एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. मंदिरासमोर भीक मागणाऱ्या या महिलेने आपल्या आयुष्यभराचे तब्बल 6 लाख 61 हजार रुपये शहीद जवानांच्या कुटुंबियांना दिले आहेत.

सध्याच्या घडीला सोशल मीडियात राजस्थानातील अजमेरमधील एका मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या महिलेने दाखवलेली देशभक्ती सर्वांचा कौतुकाचा विषय ठरत आहे. देवकी शर्मा असे या भीक मागणाऱ्या महिलेने आयुष्यभर भीक मागून जमा केलेली रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबाला दिली आहे. देवकी शर्मा सध्या या जगात नाहीत. त्यांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. पण त्यांनी जमा केलेली रक्कम त्यांच्याच इच्छेनुसार शहीद जवानांच्या कुटुंबीयांना दिली आहे.

अंबे माता मंदिराच्या विश्वस्तांना आपली रक्कम काही चांगल्या कामासाठी खर्च करा असे देवकी शर्मा यांनी सांगितले होते. मंदिराचे विश्वस्त संदीप यांनी त्यानुसार देवकी शर्मा यांच्या शेवटच्या इच्छेनुसार, त्यांनी जमवलेली रक्कम अजमेरचे जिल्हाधिकारी विश्वमोहन शर्मा यांच्याकडे बँक ड्राफ्टद्वारे सुपूर्द केली. जिल्हाधिकाऱ्यांनी महिलेने भीक मागून जमवलेली संपूर्ण रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केली. दरम्यान ज्यावेळी त्यांचे निधन झाले त्यावेळी त्यांच्या अंथरुणाखाली आणखी दीड लाख रुपये सापडले होते.

Leave a Comment