उदयनराजेंविरोधात भाजपकडून या दिग्गज नेत्याला उमेदवारी?

udyanraje
मुंबई : काही दिवसांपुर्वीच शिवसेना आणि भाजपने पुन्हा एकदा आपला संसार थाटल्यानंतर आता आगामी लोकसभा निवडणुकीत कोणाला उमेदवारी द्यायची याची लगबग सुरु आहे. त्यात आता उदयनराजे भोसले यांचा गड असलेल्या सातारा जिल्ह्यात भाजपकडून माजी आमदार नरेंद्र पाटील यांचे नाव समोर येत आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याआधी नरेंद्र पाटील विधानपरिषदेचे आमदार होते.

माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे नरेंद्र पाटील पुत्र आहेत. नरेंद्र पाटील यांची सातारा, वाई, कोरेगाव, पाटण येथे माथाडी मतदारांवर पकड आहे. मराठा मोर्चे निघाला होते, त्यात सातारा पट्ट्यातील लोकांचा सर्वाधिक समावेश होता. त्यामुळे नरेंद्र पाटील यांना ही मते मिळतील अशी अपेक्षा असल्यामुळे भाजपकडून साताऱ्यात उदयनराजेंविरोधात नरेंद्र पाटील रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

भाजपने सातारा मतदारसंघ हा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दिला होता. परंतु यंदाच्या निवडणुकीत ही जागा भाजपकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता रामदास आठवले काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment