घडी बाबाला घड्याळ वहा आणि मनोकामना पूर्ण करा

ghadi
देव प्रसन्न व्हावा आणि आपली इच्छा त्याने पूर्ण करावी यासाठी अनेक प्रकारचे नवस देवाला बोलले जातात. त्यात नारळापासून दागिन्यांपर्यंत विविध वस्तू देवाला वाहण्याचा नवस केला जातो. मिठाई, फळे या गोष्टीही देवाला वहिल्या जातात. काशी विश्वनाथच्या वाराणसी पासून ७० किमी वर असलेल्या जौनपुर येथील ग्रामदेवता ब्रह्मबाबा यांना घड्याळे वाहिली जातात. देशातील असे हे बहुदा पहिलेच आणि एकमेव मंदिर असावे.

ghadi1
ब्रह्मबाबा यांना नवसपूर्तीसाठी गेल्या तीस वर्षात इतकी विविध घड्याळे वाहिली गेली आहेत कि मंदिरात. आजूबाजूच्या झाडांवर नुसती घड्याळेच दिसतात. असे सांगतात कि एका स्थानिक व्यक्तीला ट्रक ड्रायव्हर व्हायचे होते तेव्हा त्याने ब्रह्मबाबांना नवस केला आणि तो ट्रक ड्रायव्हर बनला. त्याने इच्छा पूर्ण झाली म्हणून ब्रह्मबाबांना घड्याळ अर्पण केले आणि तेव्हापासून हि प्रथा सुरु झाली. त्यामुळे आता या देवळाला घडी बाबा मंदिर असेच नाव पडले आहे.

गेली ३० वर्षे हि प्रथा सुरु असून या मंदिरात दर्शनासाठी लांबून भक्त येतात. विशेष म्हणजे अगदी महाग घड्याळे येथे वाहिली गेली आहेत तरी गेल्या ३० वर्षात त्यातील एकही चोरीस गेलेले नाही.

Leave a Comment