निजाम महबूब आले पाशाच्या जुती मध्ये होता जेकब हिरा

nijam
दिल्लीत निजामाच्या दागदागिन्याचे प्रदर्शन सुरु असून त्यात जगातील सर्वात मोठे जेकब हिरा मांडला गेला आहे. जगप्रसिद्ध कोहिनूर हिऱ्याच्या दुप्पट आकाराचा हा हिरा प्रदर्शनाचे आकर्षण बनला असताना त्याची एक मजेदार कहाणी समोर आली आहे. या हिऱ्याची सध्याची किंमत ४०० कोटी आहे. हा हिरा सहावा निजाम महबूब पाशा यांच्याकडे होता आणि तो चोरीला जाऊ नये म्हणून निजाम तो पायातील जुती मध्ये ठेवत होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाला तो जुती मध्येच सापडला पण त्याला त्याची किंमत माहिती नव्हती. त्यामुळे तो या हिऱ्याचा वापर पेपर वेट म्हणून करत होता.

jacob
१८४.७५ कॅरेट वजनाचा हा हिरा १२५ वर्षापूर्वी आफ्रिकेतील खाणीत सापडला होता. तो व्यापारी संघाने अॅमस्टरडॅम पैलू पाडून अधिक आकर्षक केला व अलेक्झांडर मेल्कोन याने तो भारतात आणला. निजाम महबूब पाशा याने हा हिरा भारतात आणण्यासाठी २० लाख रुपये दिले होते. या हिऱ्याची किंमत त्याकाळी १ कोटी २० लाख सांगितली गेली होती पण निजामाने तो ४६ लाखात खरेदी केला. पण नंतर त्याने हिरा घेण्याच्स नकार दिला तेव्हा ब्रिटीश लोकांनी कोलकाता न्यायालयात दावा दाखल केला. त्यानंतर निजामाने तो घेतला. पण त्याची किंमत खूप असल्याने तो चोरीस जाईल अशी भीती त्याला वाटू लागली म्हणून तो स्वतःच्या पायताणात हा हिरा ठेवत असे.