रायबरेलीतून सोनिया गांधीच लढवणार लोकसभा निवडणूक

sonia-gandhi
नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (संपुआ) अध्यक्ष सोनिया गांधी या त्यांच्या पारंपरिक रायबरेली मतदार संघातूनच निवडणूक लढवणार असून प्रियंका गांधी यावेळेस या मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण याबाबत काँग्रेस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रायबरेली मतदार संघातून सोनिया गांधी याच निवडणूक लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी राजकारणातून निवृत्त होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या पण या चर्चांना आता पूर्णविराम लागला असून सोनिया गांधी ह्या लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून आरोग्याच्या कारणांमुळे त्रस्त होत्या. त्यामुळे त्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान चार हात लांब होत्या. त्यांनी केवळ तेलंगणातील एकाच सभेला संबोधित केले होते. त्यामुळे त्यांच्या निवडणूक लढवण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वीच प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या महासचिव पदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आल्यामुळे त्या रायबरेलीमधून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले होते.

Leave a Comment