पहिल्यांदाच जमणार सोनाक्षी-नवाजुद्दीनची जोडी

combo
‘टोटल धमाल’मधील मुंगडा या गाण्यामुळे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही चर्चेत आली होती. तिच्या गाण्यावरुन तिच्यावर अनेकांनी टीका देखील केली होती. सध्याच्या घडीला सोनाक्षी तिच्या आगामी कलंक या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असतानाच तिच्या झोळीत आणखी एक चित्रपट पडला आहे. यात चित्रपटात ती पहिल्यांदाच बॉलीवूडचा धाकड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत झळकणार आहे.

‘बोले चुडिया’ असे सोनाक्षी आणि नवाजुद्दीनच्या आगामी चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाची निर्मिती नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ शमास नवाब सिद्दीकी करणार आहे. शमास गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटासाठी अभिनेत्रीचा शोध घेत होता. त्याचा हा शोध आता पूर्ण झाला असून त्याने सोनाक्षीची मुख्य अभिनेत्री म्हणून निवड केली आहे. दरम्यान, या चित्रपटासाठी सोनाक्षीने देखील होकार दिला असल्यामुळे या चित्रपटाचे लवकरच चित्रीकरण सुरु करण्यात येणार आहे.