देशातील 16 कोटी नागरिक पेताड

addiction
नवी दिल्ली – केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने एम्स रुग्णालयाच्या नॅशनल ड्रग डिपेन्डन्स ट्रीटमेंट सेंटरच्या (एनडीडीटीसी) मदतीने देशभरातील ३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वेक्षण केले असून या सर्वेक्षणातून भारतामध्ये तब्बल १६ कोटी नागरिक दारू किंवा तत्सम पदार्थाचे व्यसन करत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. देशभरातील वय वर्षे १० ते ७५ या वयोगटातील तब्बल १६ कोटी लोक मद्यपी असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

देशभरातील १८६ जिल्ह्यांमधील दोन लाखांहून अधिक कुटुंबांना या सर्वेक्षणासाठी भेटी दिल्या आहेत. तब्बल चार लाख ७३ हजार ५६९ लोकांशी सर्वेक्षणासाठी संवाद साधला आहे. अशा प्रकारचा राष्ट्रीय स्तरावरील अभ्यास १५ वर्षांनंतर समोर आला असून यामध्ये राज्यपातळीवरील व्यसनाधीनतेचीही वेगळी आकडेवारी मांडण्यात आली आहे

दारूचे व्यसन पुरुषांमध्ये महिलांच्या तुलनेत १७ पट अधिक असल्याचे सर्वेक्षणातून उघड झाले आहे. दारूचे व्यसन असणाऱ्यांची संख्या छत्तीसगढ, त्रिपुरा, पंजाब, अरुणाचल प्रदेश आणि गोवा या राज्यामध्ये अधिक आहे. तर उत्तर प्रदेश, पंजाब, सिक्कीम, छत्तीसगढ आणि दिल्ली या राज्यांत ड्रग्ज ऑडिक्टची सर्वाधिक संख्या आहे. व्यसनाधीनांमध्ये ३८ जणांपैकी फक्त एकाला व्यसनमुक्तीसाठी उपचार मिळाल्याचे, तर १८० जणांपैकी एकाला यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वास्तव समोर या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Leave a Comment