… तर आगामी काही महिन्यात हुवाई घेऊ शकते 5Gची चाचणी

huwae
नवी दिल्ली – हुवाईला 5जीची चाचणी घेण्याची परवानगी अद्याप केंद्रीय दूरसंचार विभागाने दिली नसल्याचे समोर आले होते. पण आम्हाला सरकारने परवानगी दिल्यास आम्ही आगामी एक महिन्यात 5 जीची चाचणी घेऊ, असे हुवाई इंडियाचे सीईओ जय चेन यांनी 5जी च्या कार्यशाळेत म्हटले आहे.

केंद्र सरकारसोबत आमची ५जी बाबत झालेली चर्चा सकारात्मक असून आम्ही 5जी सुरू करण्यासाठी भारती एअरटेल, रिलायन्स जिओसह बीएसएनएलबरोबर चर्चा करत असल्याचे देखील जय चेन यांनी म्हटले आहे. हुवाईला भारताने 5जी मधून वगळणे हे तर्काला अनुसरुन ठरणार नाही. कारण हुवाई 5जी च्या ईको सिस्टिममध्ये नवसंशोधन केलेले तंत्रज्ञान आणणार आहे. भारत या तंत्रज्ञानाला मुकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारताचे स्वत:चे याबाबत मत असेल अशी त्यांनी आशा व्यक्त केली. क्रिकेटशिवाय जसा भारत तसे हुवाईशिवाय 5जी अशी परिस्थिती असेल, असा त्यांनी दावाही केला.

Leave a Comment