कोब्रा पोस्टच्या स्टिंग ऑपरेशनमुळे पैसे घेऊन निवडणूक प्रचार करणाऱ्या सेलिब्रेटींचे भांडाफोड

cobra-post
नवी दिल्ली – अवघ्या काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुकींचे बिगुल वाजणार आहे. त्याचपूर्वी कोब्रा पोस्टने या निवडणुकांच्या प्रचारासाठी बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटी पैसे घेऊन प्रचार करणार असल्याचा दावा केला आहे. या वेबसाइटने यासंदर्भातील ३० पेक्षा जास्त कलाकार पैसे घेऊन प्रचार करण्यास तयार असून सुमारे ३६ कलाकारांची एक यादीच जाहीर केली आहे. बॉलिवूडमधील काही दिग्गज सेलिब्रेटींचा यामध्ये समावेश आहे.

स्टिंग ऑपरेशनचा हवाला देत कोब्रा पोस्टने पैसे घेऊन पक्षाचा प्रचार करण्यास जॅकी श्रॉफ, शक्ती कपूर, विवेक ओबेरॉय, सोनू सुद, अमिषा पटेल, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, पुनीत इस्सर, सुरेंद्र पाल, पंकज धीर, निकीतिन धीर, टिस्का चोप्रा, दीपशिखा नागपाल, अखिलेंद्र मिश्रा, रोहित रॉय, राहुल भट्ट, सलीम जैदी, राखी सावंत, अमन वर्मा, हितेन तेजवानी, गौरी प्रधान, सनी लिओनी, कोयना मित्रा, इवलिन शर्मा, पूनम पांडे हे बॉलिवूड सेलिब्रिटी तयार झाले आहेत. आहे.

त्यानंतर अभिनेत्री सनी लिओन आणि अभिनेता सोनू सूदने ‘कोब्रा पोस्ट’च्या दाव्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. सनी लिओनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर केलेल्या ट्विटमध्ये मी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा प्रचार करत नाही आणि जर कधी मी प्रचार करणार असेलच तर त्याची मी जाहीर वाच्यता करेन, असे म्हटले आहे.

सनी लिओन प्रमाणेच अभिनेता सोनू सूद याने देखील यावर प्रतिक्रिया देताना जी काही चर्चा आमच्यात झाली होती, ती चर्चा समाजापुढे चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. यात चर्चेमधील काही ठराविक भागच दाखविण्यात आला आहे. त्यासोबतच या घटनेची शहानिशा न करता तिच्यावर चर्चादेखील सुरु झाली आहे. मोठे ब्रॅण्ड, राजकीय पक्ष किंवा कार्पोरेट क्षेत्रातील जाहिराती करण्यासाठी अनेक वेळा कलाकारांना विचारणा करण्यात येते. त्यामुळे कलाकार अशा जाहिरातींसाठी तयारही होतात. पण आमच्या बद्दल चुकीच्या पद्धतीने सध्या कंटेंट सादर करण्यात येत असल्यामुळे या यादीमध्ये अनेकांची नाव आली असल्याचे त्याने म्हटले आहे. दरम्यान, ‘कोब्रा पोस्ट’ने लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी ३० पेक्षा जास्त कलाकारांनी पैसे घेऊन प्रचार करण्यास तयारी दर्शविल्याचा दावा केला आहे.

Leave a Comment