हे चिमुकले रेस्टॉरंट ठरले जगातील बेस्ट रेस्टॉरंट

wolfgat
द. आफ्रिकेतील मच्छिमारांच्या गावात असलेले एक चिमुकले रेस्टॉरंट वोल्फगाट जगातील बेस्ट रेस्टॉरंट म्हणून निवडले गेले असून फ्रान्सच्या पॅरीस मध्ये झालेल्या वर्ल्ड रेस्टॉरंट अवार्ड देऊन त्याला सन्मानित केले गेले. पिटरनॉस्टर बीच वर असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये एकावेळी फक्त २० ग्राहक बसू शकतात.

रेस्टॉरंटचा मुख्य शेफ कोबुस ला सांगतो, वयाच्या ३० पर्यंत मी कुकिंग कडे कधीच गंभीरपणे पहिले नव्हते. रोजच्या पदार्थात मी रोज नवीन काहीतरी करायच्या प्रयत्न करायचो. त्यातून काही नवीन पदार्थ अफलातून जमून गेले. तेच येथे आता लोकप्रिय पदार्थ बनले आहेत. येथे ७ कोर्स मेन्यू साठी फक्त ६० डॉलर्स मोजावे लागता. शेफ येथे ब्रेड आणि बटर स्वतः बनवितो.

resto
या रेस्टॉरंट मध्ये सर्व ६ वेटर महिला आहेत. त्यांना कोणतेही खास प्रशिक्षण दिले गेलेले नाही. या सर्वांनी मिळून दोन वर्षापूर्वी हे रेस्टॉरंट सुरु केले ते एका तंबूत. ३० वर्षे जुनी एक कॉटेज आणि एक गुहा येथे या रेस्टॉरंटचा पसारा असून समोर अथांग आणि सुंदर सागर आहे. येथे आपण कधी नावही ऐकले नसेल असे अनेक पदार्थ मिळतात आणि ते अतिशय स्वादिष्ट आहेत असे पर्यटक सांगतात. अर्थात हे सारे श्रेय शेफ कोबूस याचे आहे.

Leave a Comment