भारतात सिंगल हेल्पलाईन नंबर ११२ लाँँच

emergemcy
अमेरिकेत ज्याप्रमाणे ९११ हा सिंगल हेल्पलाईन नंबर आहे त्याच धर्तीवर भारतात इमर्जन्सी सेवेसाठी ११२ हा सिंगल हेल्पलाईन नंबर लाँच करण्यात आला. गृहमंत्री राजनाथसिंग यांनी या नंबरचे उद्घाटन केले. दे म्हणाले इमर्जन्सी रीस्पॉन्स सपोर्ट सिस्टीमखाली हेल्पलाईन ११२ सुरु झाली आहे.

आत्तापर्यंत पोलीस मदतीसाठी १००, आग लागल्यास १०१, महिला मदत १०९० हे हेल्पलाईन नंबर आहेत. आता नवीन ११२ नंबर फिरवून वरीलपैकी आवश्यक मदतीसाठी सहाय्य मागता येणार आहे. म्हणजे ११२ नंबर फिरुवून पोलीस, आग आणि महिला मदत असे तिन्ही ठिकाणी मदत मागविता येणार आहे. त्यामुळे आवश्यक मदत मागविताना हे वेगवेगळे नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाही. या सेवेत लवकरच हेल्थ मदतीसाठी असलेला १०८ नंबर या सेवेशी जोडला जाणार आहे.

Leave a Comment