बंकर म्हणून बांधलेल्या घराची १२८ कोटी किंमत

bunker
अमेरिकेच्या लास वेगास नगरीत जमिनीखाली २६ फुटावर बांधलेल्या एका बंकरला घराचे स्वरूप दिले गेले असून त्याची किंमत १२८ कोटी आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये सुरु झालेल्या शीत युद्ध काळात अण्वस्त्र हल्ल्यापासून संरक्षण व्हावे म्हणून हा बंकर उद्योजक जीराल्ड हेन्डरसन याने बांधला होता. त्याला नंतर अलिशान घराचे स्वरूप दिले गेले.

bunker1
या घरात बेडरूम्स, ६ बाथरूम्स, सर्व्हंट क्वार्टर, स्विमिंग पूल, बार इतकेच काय पण नाईट क्लबही आहे. एकूण १५ हजार चौरस फुट परिसरात उभारलेल्या या घराला नैसर्गिक सूर्यप्रकाश, हवा, वारा, पाऊस नाही. मात्र या सर्व गोष्टीचा अनुभव यावा याप्रकारे कृत्रिम व्यवस्था केली गेली आहे. १९८३ मध्ये जीराल्डचा मृत्यू झाल्यावर त्याची पत्नी यथे १९८९ पर्यंत राहिली आणि नंतर मात्र तिने हे बंकर घर विकण्याचे ठरविले तेव्हा त्याला १२८ कोटींची किंमत मिळाली.

Leave a Comment