व्हिडीओ ः चक्क साबण खाऊन ही महिला सांगते साबणाचा रिव्ह्यू

soap
आजच्या इंटरनेटच्या युगात आपण कोणतीही गोष्ट विकत घेण्याआधी तिची चार ठिकाणी माहिती गोळा करतो, त्याचे ऑनलाईन रिव्ह्यू देखील पाहतो. फक्त यासाठीच की आपण घेतलेल्या वस्तुमुळे आपले नुकसान होऊ नये. असेच विविध उत्पादनाचे रिव्ह्यू आपण वाचतो किंवा पाहतो. पण सध्या इंडोनेशियातील एक महिला तिच्या रिव्ह्यू देण्याच्या पद्धतीमुळे इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. या महिलेचे नाव खोसिक असयिफा असे असून तिची साबणाचा रिव्ह्यू सांगण्याची पद्धत काही औरच आहे. ती रिव्ह्यू सांगण्यासाठी चक्क तो साबण खाते.

आपल्या वेगळ्या आणि विचित्र रिव्ह्यू सांगण्याच्या पद्धतीमुळे इंडोनेशियातील जावा प्रांतात राहणारी ही खोसिक असयिफा ही चर्चेत आली आहे. ती एखाद्या साबणाचा रिव्ह्यू सांगताना चक्क आईस्क्रीमप्रमाणे साबण चाटते आणि खाते देखील. तिचे रिव्ह्यू सांगणारे अनोखे व्हिडीओ लोकांच्या पसंतीस देखील उतरत आहेत. त्याप्रमाणे काही फॉलोअर्स तिला पर्याय देखील सुचवत असतात. फॉलोअर्स तिला कोणत्या उत्पादनाचा रिव्ह्यू बघायचा आहे ते सांगतात.
soap1
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान खोसिकने सांगितले की, दोन वर्षापूर्वी मी गर्भवती असताना मला साबण खाण्याचे डोहाळे लागते होते. मला साबण खाण्याची सवय एक वेळ आंघोळ करताना लागली. त्यानंतर साबणाची चव मला एखाद्या फळासारखी लागली. मला माहित आहे की माझी ही सवय फार विचित्र आहे, म्हणून त्याची वाच्यता मी माझ्या पतीजवळ देखील केली नाही. या दरम्यान मला पोटाचा कोणताही विकार झाला नाही. माझ्या या कामामुळे माझ्यावर अनेकदा टीका देखील झाली. काहीजण तर माझ्या या कामाला पब्लिसिटी स्टंट देखील म्हणत असतात.

Leave a Comment