अवघ्या 3.2 षटकातच संपला 50 षटकांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना

scotland
अल अमरात : 50-50 षटकांच्या एकदिवसीय सामन्यात ओमान आणि स्कॉटलंड संघांनी मंगळवारी एक वेगळ्याच विश्वविक्रमाला गवसणी घातली. स्कॉटलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि अवघ्या 17.1 षटकांत ओमानच्या संघाचा संपूर्ण डाव 24 धावांवर गुंडाळला. त्यानंतर फलंदाजी उतरलेल्या स्कॉटलंडने अवघ्या 3.2 षटकात एकही विकेट न गमावता विजयासाठीचे 25 धावांचे लक्ष्य पार केले.

स्कॉटलंड सध्या ओमानच्या दौऱ्यावर असुन त्यांच्या दरम्यान एकदिवसीय मालिका सुरु आहे. दरम्यान आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून स्कॉटलंडने यजमान ओमान संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. फलंदाजीला आलेला ओमानचा संघ अवघ्या 17.1 षटकांत 24 धावाच करु शकला. त्यानंतर 24 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या स्कॉटलंड संघाने एक ही गडी न गमावता अवघ्या 3.2 षटकात 25 धाव करत सामना जिंकला. या नकोशा विक्रमात वेस्ट इंडिजचा 19 वर्षांखालील संघ आघाडीवर आहे. 2007 मध्ये बार्बाडोस संघाने विंडीजच्या 19 वर्षांखालील संघाचा संपूर्ण डाव 18 धावांत गुंडाळला होता. त्यानंतर सॅरॅसेन्स एससीचा ( 19 धावा, वि. कोल्ट्स एससी, 2012) आणि मिडलेसेस्क ( 23 धावा, यॉर्कशायर, 1974) यांचा क्रमांक येतो.

Leave a Comment